हिमायतनगर तालुक्यात व्यसनमुक्तीसाठी पोलिसांचे जनजागृती अभियान



हिमायतनगर : तालुक्यात वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी हिमायतनगर पोलिस स्टेशनच्या वतीने व्यसनमुक्ती जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. “व्यसनापासून दूर राहा; आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करा,” असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
पोलिस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध खेडेगाव, वाडी व तांड्यांवर जाऊन नागरिकांना व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. डॉक्टर, समाजसेवक तसेच पत्रकार यांच्या माध्यमातूनही नागरिकांमध्ये व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती केली जात आहे.
व्यसनामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर तसेच कुटुंबाच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे युवकांसह नागरिकांनी व्यसनापासून दूर राहून निरोगी व सुरक्षित जीवन जगावे, असे आवाहन हिमायतनगर पोलिसांनी केले आहे.
या अभियानामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होत असून, “व्यसनमुक्त गाव, सुरक्षित कुटुंब” या दिशेने जनजागृतीला चालना मिळत आहे.

Post a Comment

0 Comments