*संभाजी भिडेंच्या कार्यक्रमास आंबेडकरी संघटनांचा विरोध*



 भोकर : ( प्रतिनिधी ) छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनाचे औचित्य साधून दि.16 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेला संभाजी भिडे यांचा कार्यक्रम रद्द करण्यात यावा अन्यथा हा कार्यक्रम उधळून लावण्यात येईल असा इशारा विविध आंबेडकरी सामाजिक संघटनांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.


    केवळ महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी हे भडकाऊ भाषणे देऊन  महाराष्ट्रातील मराठा , बहुजन तरुणांची  डोके भडकवतात परिणामस्वरूप त्याचे धार्मिक ध्रुवीकरण होऊन जातीय दंगली निर्माण होतात असा आरोप भिम टायगर सेना व युवा पँथर या सामाजिक संघटनेकडून देण्यात आलेल्या निवेदनात  करण्यात आला आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणी दंगल घडवून आणल्याचा आरोप  संभाजी भिडे यांच्यावर असून त्यांच्या बद्दल समस्त आंबेडकरी जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे . भिडे यांचा कार्यक्रम भोकर शहरात  झाल्यास येथील शांतता व सुव्यवस्था तसेच धार्मिक सलोखा धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे .केवळ नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय तेढ निर्माण करण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असा आरोप युवा पँथर्स संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप गायकवाड व भीम टायगर सेनेचे जिल्हा अध्यक्ष मिलिंद गायकवाड , ता . अध्यक्ष निखील हंकारे यांनी निवेदनाद्वारे करून सदरील कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली आहे.

पोलीस निरीक्षक यांना भिम टायगर सेनेकडून देण्यात आलेल्या निवेदनावर सामाजिक  कार्यकर्ते तथा वंचीत बहुजन आघाडीचे नेते केशव मुद्देवाड वंचीत बहूजन आघाडीचे तालुका संघटक गजानन ढोले , सम्राट हिरे, राहुल सोनकांबळे,मनोज मनपूर्वे , तालुका अध्यक्ष निखिल हंकारे, संम्यक चौदंते, पवन डाके, विजय लोखंडे ,प्रतिक कदम, सतीश भवरे,दिलीप कंधारे, नितेश चौदंते,आकाश कंधारे, गंगाधर नक्कलवाड,विजय दवणे,सचिन राऊत, सुगत कसबे, गंगाधर सोनकांबळे,फिरोज पठाण, गजानन टिकेकर आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत . दरम्यान  शिवसेनेचे पदाधिकारी  असलेले  आयोजक  माधव वडगांवकर प्रस्तूत प्रतिनिधी ने भ्रमणध्वनी द्वारे  संपर्क साधल्यानंतर " सभा तर होणारच " अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे .

Post a Comment

0 Comments