उमरी :(प्रतीनिधी )सध्या मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यासह तालुक्यात संचारबंदी लागू असताना सुध्दा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला धुडकावून भारत मायक्रो फायनान्स कंपनी आपले कर्मचारी पाठवून तालुक्यातील गोरगरीब महिलांना तुम्हाला कर्ज देऊ अशी आशा दाखवत पाच पन्नास महिलांना एकत्र जमा करून हफ्ते भरा नाहीतर तुम्हाला व्याज लागेल परत कर्ज भेटणार नाही असे सांगून सक्तीने वसुली चालु आहे,ह्या फायनान्स कंपनी मार्फत जे महिलांना जे कर्ज वाटप होते ते पण हातो हात दिल्या जाते नियमाप्रमाणे त्यांच्या बचतगट खात्यात जमा न करता,यामुळे सरकारचा इनकम टॅक्स पण ह्या कंपन्या मोठ्या प्रमाणात बुडतवतात जेंव्हा ह्या वेळेस कोरोना सारख्या महाभयंकर बिमारी संपुर्ण जगात वाढत असताना महिलांना एकत्र केल्या मुळे कोणाला संसर्ग झाल्यास ह्याला जिमेदर कोण असा सवालही त्यांनी केला, संचारबंदी काळात पाच पन्नास महिलांना एकत्र करून मा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला धुडकावून संचारबंदीचा भंग केल्याप्रकरणी तात्काळ भारत मायक्रो फायनान्स कंपनीवर कारवाई करण्यात यावी आणि त्या फायनान्स कंपनी चे लायसन्स रद्द करण्यात यावे अशी मागणी ही भारत प्रभात पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवराज मोकंपल्ले यांनी जिल्हाधिकारी इटनकर साहेब यांच्या कडे माननीय तहसीलदार बोथिकर साहेब यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले
0 Comments