विशेष (प्रतिनिधी) – भोकर येथील तहसीलदार श्री. विनोद गुंडमवार, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी संगनमत करून, गट नंबर ३९९ वर असलेल्या ताब्याच्या नोंदीत खाडाखोड करुन गैरअर्जदारास वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करत, उपविभागीय अधिकारी यांनी याप्रकरणी चौकशी करून न्याय मिळवून द्यावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद इलियास अब्दुल वहिद यांनी दिनांक १२ऑगस्ट पासून आमरण उपोषणाला बसले आहेत.
शेतजमीन गट क्र. ३३९, क्षेत्र ४८ गुंठे या जमिनीवरील हक्क प्रकरणी अर्जदाराचा दावा नाकारण्यासाठी, २३ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या पंचनाम्यात फेरफार करून चुकीची माहिती दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, ३० डिसेंबर २०२४ रोजी तहसीलदारांनी स्वतःच बेकारदेशीर आदेश काढल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
अर्जदाराच्या मते, या अन्यायकारक आदेशामुळे त्यांचा दावा फेटाळण्यात आला असून, वारंवार विनंती करूनही योग्य चौकशी व कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे, सदर जमिनीबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात आल्याचे उपोषणकर्ते मो. इलियास पि. अब्दुल वहीद यांनी सांगितले.
0 Comments