एक हजार मीटरचा तिरंगा घेऊन ‘शाहू’कडून अभूतपूर्व मानवंदना**देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक लांबीच्या राष्ट्रध्वजासह ‘तिरंगा रॅली’चे आयोजन*

*
भोकर, दि. १४ऑगस्ट –
येथील श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे आपल्या आगळ्यावेगळ्या नवोपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर ‘शाहू परिवाराकडून’ भोकरकरांसाठी राष्ट्रभक्तीची अनोखी मेजवानी साकारली. सुमारे एक किलोमीटर लांबीची ‘तिरंगा रॅली’ काढून देशाला अभूतपूर्व मानवंदना देण्यात आली. या रॅलीत सुमारे तीन हजार विद्यार्थी सहभागी झाले.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, म्हणजे १४ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता, ही रॅली शाहू महाराज विद्यालयातून सुरू झाली. मार्गात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना वंदन करून रॅली मुख्य रस्त्याने पुन्हा विद्यालयात परतली. श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण संस्थेचे सचिव श्री शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला प्रारंभ झाला. यावेळी गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विशेष आकर्षण म्हणजे, या रॅलीसाठी सुमारे एक हजार मीटर लांबीचा राष्ट्रध्वज तयार करण्यात आला होता. हा ध्वज देशाच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा राष्ट्रध्वज ठरला. यापूर्वी साडेतीन किलोमीटर लांबीचा राष्ट्रध्वज एका रॅलीत वापरला गेला होता. ‘शाहू परिवाराकडून’ तयार झालेला हा तिरंगा देशप्रेमाचे अनोखे प्रतीक ठरला.

केवळ ‘शाहू परिवारामुळे’च हा देशप्रेमाने ओथंबलेला क्षण अनुभवण्याची सुवर्णसंधी भोकरकरांना लाभली. या भव्य सोहळ्यात विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि राजकीय नेत्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ही रॅली यशस्वी करण्यासाठी प्राचार्य संजय देशमुख यांच्या पुढाकारातून शाहू परिवाराच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात आले. या रॅलीसाठी सेवा समर्पण परिवाराचेही योगदानही महत्वपूर्ण ठरले

Post a Comment

0 Comments