*भोकर तहसीलदार विनोद गुंडमवार यांची मुख्य भूमिका*
नांदेड ( प्रतिनिधी )दि. 28 जून: गणराज रिसॉर्ट, नांदेड रोड, भोकर येथे 85 भोकर विधानसभा मतदारसंघांतर्गत विशेष गहन पुनर्निरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाच्या अनुषंगाने BLO, BLA, BLO पर्यवेक्षक तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा उत्साहात पार पडली.
ही कार्यशाळा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (IAS) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी 85 भोकर विधानसभा मतदारसंघ प्रवीण मेनशेट्टी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली.
कार्यशाळेला भाजपचे दिवाकर रेड्डी, शिवसेना (शिंदे गट)चे माधव वडगावकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे संतोष आलेवाड, आरपीआय (आठवले गट)चे जयभीम पाटील, प्रहारचे शेखर कुंटे, आम आदमी पक्षाचे सय्यद अलमास, नगराध्यक्ष भगवानराव दंडवे, उपनगराध्यक्ष दिलीप सोनवडे, BLA-1 रामचंद्र मुसळे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे BLA, BLO, पर्यवेक्षक व नगरसेवक उपस्थित होते. एकूण सुमारे 400 ते 500 जणांनी सहभाग नोंदविला.
तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी SIR कार्यक्रमाची सविस्तर माहिती देत गणना फॉर्म भरताना घ्यावयाची काळजी, मतदार पडताळणी, मॅपिंग प्रक्रिया आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. तसेच निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार रामेश्वर सावते यांनीही उपस्थितांना आवश्यक सूचना दिल्या.
मतदारांनी BLO कडून मिळालेल्या गणना फॉर्ममधील माहिती तपासून ती योग्य असल्याची खात्री करून दिनांकासह स्वाक्षरी करावी व पासपोर्ट आकाराचा फोटो जोडावा, असे आवाहन करण्यात आले. ज्या मतदारांचे मॅपिंग अद्याप झालेले नाही त्यांनी 2002 च्या मतदार यादीतील स्वतःचा किंवा आई-वडील अथवा आजी-आजोबांचा तपशील शोधून संबंधित BLO कडे सादर करावा, असेही सांगण्यात आले.
ज्या मतदारांचे गणना फॉर्म भरून प्राप्त होणार नाहीत, त्यांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळली जाऊ शकतात, त्यामुळे सर्व मतदारांनी वेळेत फॉर्म भरून द्यावा. तसेच हा फॉर्म Voter Help Portal द्वारे ऑनलाइनही भरता येणार असल्याची माहिती देण्यात आली.
दि. 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत BLO हे घरोघरी जाऊन गणना फॉर्मचे वितरण व संकलन करणार आहेत. त्यामुळे मतदारांनी पासपोर्ट आकाराचा फोटो, जन्मतारीख, आधार क्रमांक, आई-वडील किंवा पती-पत्नीची माहिती, ओळखपत्र क्रमांक व मोबाईल क्रमांक आदी तपशील तयार ठेवावेत, असे आवाहन तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी केले.
कार्यशाळेच्या आयोजनासाठी नायब तहसीलदार रामेश्वर सावते, पेशकार शेळके, संगणक चालक संजय सूर्यवंशी, साई जोगळेकर तसेच निवडणूक
0 Comments