भोकर नगर परिषद निवडणुक वार्ड क्रमांक ४ मधील मतदारांची स्थानिक उमेदवारास पसंती


भोकर ( प्रतिनिधी )  येथील नगर  परिषदेच्या २०२० निवडणूकीचे वातावरण तापत असून  वार्ड  क्रमांक ४  मधील मतदार आत्तापासूनच स्थानीक   उमेदवारासाठी आग्रह धरत असताना दिसून येत आहे .

भोकर विधानसभा मतदार संघ हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री  तथा  विद्यमान सार्वजनिक  बांधकाम मंत्री  अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असून न . प . अस्तीत्वात आल्यापासून म्हणजेच गत दहा वर्षांपासून  भोकर नगर परिषदेवर अशोकराव चव्हाणांनी आपली पकड सैल होऊ दिली नाही . दरम्यान  नव्याने  झालेल्या वार्ड पुनर्रचनेत  अनेक आजी-माजी नगरसेवकाचा हिरमोड झाल्याने आता आपापल्या सोईच्या वार्डची चाचपणी   करीत आहेत . माजी नगराध्यक्ष साहेबराव सोमेवाड यांचा वार्ड असलेल्या वार्ड क्रं ४ हा अनुसुचीत जाती प्रवर्गासाठी आरक्षीत झाल्याने येथे आपल्या वार्डातून विस्थापित झालेले अनेक प्रस्थापीत नेते यांनी या वार्डाकडे आपला मोर्चा वळविला असल्याचे समजते. सोबतच नव्या उमेदवारांनी फिल्डींग लावण्यासाठी आतापासूनच  मतदारांच्या भेटी  गाठी घेऊन त्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे . 

दरम्यान प्रस्तूत वार्डामध्ये  अनेक इच्छुकांची मांदियाळी प्रचाराची उठाठेव करत असले तरी  राजकारणात नवखे असलेल्या या वार्डातील स्थानिक रहिवासी  सिद्धार्थ जाधव यांच्या नावाची भावी नगरसेवक म्हणून सर्वाधिक चर्चा होताना येथे ऐकावयास मिळत आहे. सिद्धार्थ जाधव हे उमेदवारीसाठी  राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संपर्कात असल्याचे कळते. या वार्डात सर्वाधिक कामगार कष्टकऱ्यांची संख्या अधिक असून या वार्डातील  नागरी समस्या सोडविण्यासाठी   येणाऱ्या काळात सामान्य जनतेच्या सुखा दुःखातील नगरसेवक असावा म्हणून स्थानिक उमेदवारांना येथील नागरिक अधिक पसंती देत असून माघील निडणुकीत स्थानीक उमेदवार असल्याने साहेबराव सोमवाड हे अपक्ष निवडुन आले  होते आता सोमवाड हेही स्थानीक उमेदवारासाठी पक्षश्रेष्ठी कडे अग्रह धरणार असल्याचे कळते .

Post a Comment

0 Comments