Breking news 🗞️

मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम आरक्षणाला विरोेध हे हिमताने सांगावं – देवेंद्र फडणवीस

मुंबई:–मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम आरक्षणाला विरोेध हे हिमताने सांगावं असं आव्हान माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे.
धर्माच्या आधारे मुस्लिमांना आरक्षण देता येणार नाही. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध असून त्यांना आम्ही आरक्षण देऊ शकत नाही, हे मुख्यमंत्र्यांनी हिमताने सांगावं, असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केलं आहे.
विधानपरिषदेत शासनाच्यावतीने अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देणार अशी घोषणा केली. यावर मुख्यमंत्र्यांचं मत वेगळं असेल तर त्यांनी स्पष्ट करावं. आमच्यापर्यंत मुस्लिम आरक्षणाचा विषय आलेला नाही, असं गालेगोल उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं, अशी टीका फडणवीस यांनी केली.
दरम्यान, आरक्षणाचा विषय हा तुमच्याच मंत्र्यांनी मांडला आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नसल्याचं ठाकरेंनी स्पष्टपणे सांगावं, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे

Post a Comment

0 Comments