नांदेड (प्रतिनिधी)- येथील देगलूर नाका परिसरातील हैदरबाग रस्त्यावर ‘ताहा सिल्व्हर पॅलेस’ येथे एमआयएम (मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) पक्षाचा कार्यकर्ता मेळावा बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी रात्री सात वाजता आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी समीर साजिद बिल्डर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला प्रदेश कार्याध्यक्ष सय्यद मोईन, मराठवाडा विभागीय अध्यक्ष फिरोज लाला, समीर साजिद, तसेच अल्ताफ व पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील पदाधिकारीही या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याला समीर साजिद बिल्डर यांनीही मार्गदर्शन केले. तसेच सर्व कार्यकर्त्यांना सावध राहण्याचे आवाहन केले.
या वेळी पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले की, एमआयएम पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांमध्ये भाग घेणार आहे. तसेच, या निवडणुकांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी, माजी खासदार इम्तियाज जलील आणि आक्रमक नेते अकबरुद्दीन ओवैसी हे देखील येणार आहेत.
या प्रसंगी बोलताना सय्यद मोईन म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी अशोक चव्हाण यांच्या इशाऱ्यावर मुस्लिम बहुल भागांमध्ये काम करणे सुरू ठेवले आहे. आजही काँग्रेसमधील मुस्लिम पदाधिकारी, माजी नगरसेवक हे अशोक चव्हाण यांच्याशी सौख्य ठेवून असल्याचे पहावयास मिळते. मुस्लिम समाजाचे स्वयंघोषित नेते खासदार अशोक चव्हाण त्यांच्या घरी जातात हे आता मुस्लिम समाजाने बघितले आहे. त्यामुळे जनतेने त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
मुस्लिम भागांमध्ये आजवर विकास झाला नाही, त्याला हीच मंडळी जबाबदार आहेत. एमआयएम या निवडणुकांमध्ये विजयी होईल आणि आम्ही परिस्थिती बदलू असा विश्वास सय्यद मोईन यांनी व्यक्त केला. एवढेच नाही तर काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या महानगरपालिकेने शहरातील सर्व घनकचरा मुस्लिम बहुल भागात आणून टाकला होता परंतु तत्कालीन एमआयएमच्या 72 11 नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मांडून मोठ्या ताकतीने हा घनकचऱ्याचा प्रोजेक्ट तुपा परिसरात हलवला हा खऱ्या अर्थाने एमआयएमचा विजय होता त्यामुळे आजही खऱ्या अर्थाने मुस्लिम बहुल भागामध्ये एम आय एम पक्षाची ताकद दाखवून देणे गरजेचे आहे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून द्यावे असे आवाहनही मोईन यांनी केले. पूरग्रस्तांसाठी धान्य किट आणि वैद्यकीय शिबिरांचे सर्वात प्रथम आयोजन करून पूरग्रस्तांना धीर दिला. आमचीच कॉपी काँग्रेसने करून त्यांना जनतेने मात्र साथ दिली नाही असेही मोईन आणि सांगितले.
कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातून आलेल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "जनतेच्या अडचणींमध्ये आम्ही सय्यद मोईन सोबत सोबत उभे राहू," असे यावेळी ठामपणे सांगण्यात आले.
या मेळाव्यासाठी एमआयएमचे जावेद शेख, नजीर शेख, रहीम पटेल, नुरुद्दीन, अब्दुल माजीद बशीर, सोहेल, मुसा लाला, मिनाज शेख, नवाब बेग, समीर खान आणि अझर आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments