प्रभाग क्र.2 व्यंक्टेश असावा यांची निवडणूक लढविण्याची तयारी
भा.ज.पा पक्षाकडे करणार उमेदवारीची मागणी
भोकर()गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षात सक्रियरित्या काम करून पक्षाची ध्येय धोरणे जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करणारे उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते व्यंकटेश असावा हे प्रभाग क्रमांक दोन मधून निवडणूक लढविण्यास सज्ज असून भारतीय जनता पक्षाकडे ते उमेदवारीची मागणी करणार आहेत.
गेल्या वीस वर्षापासून राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित आहेत पवार कॉलनी सहित शहरातील इतर भागात सर्वांच्या सुखदुःखात ते नेहमीच धावून जातात कोणताही सामाजिक काम असो धार्मिक काम असो त्यामध्ये पुढाकार घेऊन ते काम कशाप्रकारे यशस्वी होईल यासाठी ते परिश्रम घेतात गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना या भागातून मताधिक्य देण्याचे काम त्यांनी केलेले आहे यामुळे जनसामान्यांमध्ये व पक्षाच्या वरिष्ठाकडे त्यांची चांगली प्रतीमा आहे या भागातील सर्वांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ते पुढाकार घेतात यामुळे या प्रभागातील मतदार व्यंकटेश असावा यांना उमेदवारी द्यावी असे प्रतिक्रिया देत आहेत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेईल याकडे आता प्रभाग क्रमांक दोन पवार कॉलनी येथील मतदारांचे लक्ष लागलेले आहे
0 Comments