हिमायतनगर हदगांव -हिमायतनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून येथील जनतेने प्रचंड बहुमताने सर्वसामान्याचे नेते, शेतकरी पुत्र, लोकनेते,विकासपुरुष, सर्वसमावेशक नेतृत्व अशा बाबुराव कदम कोहळीकर यांना निवडून दिले. त्यानिमित्ताने प्रथमच हिमायतनगर येथील जाज्वल्य व हजारो भाविकांचे श्रद्धाष्ठान असणारे श्री परमेश्वर देवस्थान येथे पूजा अर्चना करून मनोभावे दर्शन घेऊन त्यानंतर देवस्थान कमिटीच्या च्या वतीने
पहिल्या भेटीत भव्य असं स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना नवनिर्वाचित आमदार म्हणाले की येथून पुढील पाच वर्ष मी परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो की कोणत्याच जातीवर, धर्मावर अन्याय होणार नाही त्याचं बरोबर दोन्ही तालुक्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी माझ्या जीवनातील एक ना एक सेकंद झीजवीन यासाठी मी कटिबद्ध असल्याचे आस्वासित केले.तर मला आमदार करण्यासाठी लाडक्या बहिणी,भाऊ, महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बहाद्दर मतदार व ज्यांनी प्रत्येक्ष, अप्रत्येक्ष माझ्या विजयासाठी हातभार लावला त्याचा मी अजीवन ऋणी असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी आ.बाबुराव कदम यांनी केलं.
नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला असून त्यात हदगांव हिमायतनगर च्या आमदार पदी महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे बाबुराव कदम कोहळीकर यांना येथील हुशार मतदारांनी तीस हजाराहून अधिकच्या मताधिक्याने निवडून आणून येथील घराणेशाही ला शह दिला. त्या निमित्त प्रथम आगमना पित्यार्थ हिमायतनगरचे ग्रामदैवत येथील सुप्रसिद्ध श्री परमेश्वर मंदिरात पूजा अर्चा करून भगवान परमेश्वरा चे आशीर्वाद घेण्यात आले. त्यानंतर मंदिर कमिटी कडून मंदिराचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्री श्रीमाळ व त्यांचे सदस्य यांच्या कडून यथोचित नूतन आमदार कोहळीकर यांचा सत्कार करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना आमदार म्हणाले की सर्व प्रथम मला निवडून दिल्या बद्दल येथील लाडक्या बहिणी,सुजाण मतदार, तरुण मंडळी,महायुतीच्या सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,व विशेष करून ज्यांनी आदृश हाताने या विजयात हातभार लावला त्यांचे विशेष आभारी आहे असे म्हणाले तर या विजयासाठी झाटणाऱ्या सर्वांच्या कायमचा ऋणात राहील असं मत आभार व्यक्त करतांना जिल्हा प्रमुख विवेक देशमुख यांनी व्यक्त केलं.
मी या पवित्र श्री परमेश्वरा ची शपथ घेऊन सांगतो माझ्या पुढील पाच वर्षाच्या कार्यकाळात कोणत्याच जाती, धर्माच्या व्यक्तीवर अन्याय होऊ देणार नाही,सर्वांसाठी काम करणार,सर्वांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास कसा साधता येईल या साठी मी कटिबद्ध असून जे जे शक्य आहे ते ते सर्व येथे आणण्यासाठी मी माझ्या जीवनातील एक एक क्षण यासाठीच खर्च करणार आहे. येथील एम. आय. डी. सी.लवकरात लवकर उभारून येथील स्थानिक तरुणांना त्यांच्या हाताला काम कसे मिळेल हे आधी पाहणार आहे त्याचं बरोबर याठिकाणचे सर्वच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येतील यात तिळमात्र शंका घेऊ नका असे सांगितले.प्रत्येक गावा गावात येऊन तेथील समस्या जाणून घेऊन गावाभेटी अंती आराखडा तयार करून पुढील विकासनीती अखण्यात येईल त्याचं बरोबर जनता दरबाराचे ही आयोजन करण्यात येईल असे आस्वासन दिले.
सध्या येथील अधिकारी, कर्मचारी काम वेळेवर करत नसून कामचुकारपणा करीत असल्याच्या अनेक विभागाच्या तक्रारी जमलेल्या नागरिकांतून व्यक्त केल्या त्यावर आमदार म्हणाले की येत्या दोन चार दिवसात तालुकास्तरीय सर्व अधिकारी यांची एक संयुक्तिक बैठक मी बोलावणार असून त्यांना आपल्या कामा बाबद सध्याची परिस्थिती, अडचण विचारणार त्या नंतर त्यांना वेळ देऊन कामात प्रगती नाही केल्यास त्यांची गय केल्या जाणार नसून योग्य ती कार्यवाही होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता हिमायतनगर च्या नागरिकांनी मला साहेब न समजता आपला साल गडी समजून माझ्या कडून समजा साठी ज्या कामाची गरज आहे ती पूर्ण करून घ्यावी अशी विनंती केली.आपल्या विश्वसास तडा जाऊ दिला जाणार नाही.
खरंच या विजयासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी, लाडक्या बहीणनींनी, लाडक्या दाजींनी, तरुणांनी अपार मेहनत घेतली. आपला आमदार सर्वसामान्य, आपल्या कामावर पडणारा असावं म्हणून बाबुरावजी यांना पसंती दाखवली यावेळी हिमायतनगर तालुक्यातूनही चांगली लीड दिली त्यामुळे इतके प्रचंड मताधिक्य मिळविता आले.यात असंख्य अदृश्य हाताने देखील मतदानरूपी मदत केली म्हणून मी शिवसेना(शिंदे गट )जिल्हा प्रमुख या नात्याने सर्वांच्या कायम ऋणात राहणे पसंत करतो. विवेक देशमुख जिल्हा प्रमुख शिवसेना (शिंदे गट ) नांदेड.यावेळी मंदिर कमिटी चे उपाध्यक्ष महावीर शेठ श्री श्रीमाळ,
यावेळी श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ,शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख,विकास पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य लांडगे मामा, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस आशिष सकवान, गजानन तुप्तेवार, डॉ.प्रसाद डोंगरगावकर,विजय वळसे पाटील, माजी जिल्हा परिषद तथा बांधकाम सभापती सदस्य प्रताप देशमुख, शिवसेना शहर अध्यक्ष गजानन हरडपकर,यवतमाळ जी. प. माजी सदस्य चीतांगराव सर, साईनाथ कोमावार,माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद, रामभाऊ सुर्यवंशी,वामनराव मीराशे,अभिलाष जैस्वाल, किशनराव वानखडे,विलास वानखेडे, उदय देशपांडे,जुनेद भाई, सत्यवृत्त ढोले ,राजेश जाधव, रवी जाधव,,सुनील चव्हाण,राम नरवाडे, अनवर खान पठाण, ज्ञानेश्वर पुठेवाड, विकास कळकेकर, ज्ञानेश्वर माने पोटेकर, मनोज देशमुख, विठ्ठल सूर्यवंशी,
माजी नगरसेवक सदाशिव सातव सह कार्यकर्ते व महायुतीचे पदाधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments