भोकर येथे मन्सुरी, पिंजारी, नदाफ समाजाच्यामेळाव्याचे आयोजन.

भोकर - तालुक्यात लोकसंख्येने अत्यल्प आसलेल्या मन्सुरी, पिंजारी, नदाफ समाजाचा तालुकास्तरीय मेळावा, दि.२६जुलै रोजी,येथील संगम फंक्शन हॉल येथे दुपारी दोन वा.आयोजित करण्यात आला असून यात मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे...

खरे पहाता मुस्लिम समुदायातील शैक्षणीक, आर्थिक, सामाजिक दृष्ट्या ऊपेक्षीत घटक म्हणून मन्सुरी, पिंजारी, नदाफ या समाज घटकांकडे पाहिले जाते. त्याची निंदा होते. या समाजातील मागासलेपणाच्या प्रमुखं कारणावर विचारमंथन, करण्यासाठी, शिक्षण, नौकरी व आरक्षण याविषयी नेमकी परिस्थीती काय या विषयावर चर्चा घडून आणण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील मन्सुरी, पिंजारी, नदाफ समाजाने मोठ्या संखेने उपस्थीत रहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे....

Post a Comment

0 Comments