_____________________________________
हिमायतनगर. : प्रतिनिधी संदीप कोमावार
हिमायतनगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्याने अनधिकृत दस्तावेज तयार करून शहरात लेआऊट दिलेले आहेत. त्या सर्व अनधिकृत दस्तावेजाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायण पुंडलिकराव माने यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात माने यांनी म्हटले आहे की, हिमायतनगर शहरांमध्ये मागील काहिं वर्षापासून अनधिकृत लेआऊट मोठ्याप्रमाणात करण्यात आलेले आहेत. व तसेच बहुतांश लेआऊट मध्ये तत्कालीन तहसीलदार डि. एन. गायकवाड यांची मागील तारखेमध्ये सहि घेऊन बोगस अकृषक आदेश पारीत केलेले असून जमिनीचे छोटे छोटे भाग करूण बोगस दस्त नोंदणी होतांना दिसून येत आहे. या बोगस दस्तावेजामध्ये एन. ए. आदेशाच्या प्रमाणीत प्रत जोडल्या गेलेले नाहीत, व तसेच या दस्तामध्ये नियोजन प्राधिकरणाकडून मंजूर नकाशा जोडण्यात आलेले नाहीत. नियोजन प्राधिकरणाकडून कोणत्याही प्रकारचा अंतिम मंजुरीचा आदेश झालेला नसतांना हिमायतनगर येथील दुय्यम निबंधक कोणतेही कागदपत्रे न तपासता अर्थिक देवाणघेवाण करून मूळ जमिनीचे शासकीय मूल्यांकन कमी दाखवून शासनाची दिशाभूल करीत आहेत. आणी म्हणून दुय्यम निबंधक यांनी केलेल्या अनधिकृत दस्तची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक स्वरूपात कारवाई करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायण पुंडलिकराव माने यांनी निवेदनात केली आहे.
0 Comments