
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या झाडल्या होत्या . शरद पवार यांनी तर वंचित आघाडी ही भाजपाच्या मदतीसाठीत असल्याचा आरोप केला होता. तर प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांनी मला घाबरुनच माढ्यातून माघार घेतली असा दावा केला होता. एकमेकांविरोधात मैदानात दंड थोपटणारे हे नेते आज मात्र मैदानात एकत्र सोबत उतरल्याचे पाहायला मिळाले आहे .
मुंबईत भाजपाचे माजी नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली गांधी शांतता मार्च यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी व नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात हा मार्च आयोजित करण्यात आला होता . या शांतात मार्चसाठी अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय नवाब मलिक, पृथ्वीराज चव्हाणदेखील उपस्थित होते. ही यात्रा मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ इथून ही यात्रा सुरू होणार असून अनेक राज्यांमधून मार्गक्रमण करीत ती पुढे दिल्ली येथे संपणार आहे.
सरकारने संसदेत एनआरसी रद्द करण्याची घोषणा करावी, अशी मागणी या यात्रेद्वारे सरकारकडे केली जाणार आहे.
दरम्यान महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा येथून जात ३० जानेवारी रोजी महात्मा गांधींच्या स्मृतीदिनी त्यांच्या स्मृतीस्थळी राजघाटावर ही यात्रा संपणार आहे.
0 Comments