मनमाड-मुंबई सी.एस.एम.टी.-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस चा नांदेड पर्यंत विस्तार.

नांदेड:रेल्वे बोर्डाने गाडी संख्या 22102/22101 मनमाड- मुंबई सी.एस.एम.टी.-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस ला हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानका पर्यंत वाढविण्यास मंजुरी दिली आहे. या गाडीला नवीन नंबर देण्यात आला असून हि गाडी 17611/17612  हजूर साहिब नांदेड-मुंबई सी.एस.एम.टी.-नांदेड अशी धावेल.
यानुसार, गाडी संख्या 17611 हजूर साहिब नांदेड-मुंबई सी.एस.एम.टी. नांदेड रेल्वे स्थानकावरून दिनांक 10 जानेवारी 2020 पासून रोज रात्री 22.00 वाजता सुटेल आणि मुंबई सी.एस.एम.टी. येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 10.07 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात हि गाडी संख्या 17612 मुंबई सी.एस.एम.टी. – नांदेड एक्स्प्रेस मुंबई रेल्वे स्थानकावरून सायंकाळी  18.50  वाजता दिनांक 11 जानेवारी 2020 पासून नियमित सुटेल आणि नांदेड रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी 07.20 वाजता पोहोचेल.
हि गाडी आपल्या प्रवासात पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, मनमाड, नासिकरोड, देवळाली, इगतपुरी, कसारा, कल्याण ज., ठाणे रेल्वे स्थानकावर थांबेल.
 या गाडीचे वेळा पत्रक सोबत जोडले आहे.
 

Post a Comment

0 Comments