मुंबई : महाविकासआघाडीच्या सरकारवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं संपूर्ण नियंत्रण असतांनाही राष्ट्रवादीतील काही मंत्र्यांची नाराजी असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे आता खुद्द शरद पवार या मंत्र्यांची नाराजी दूर करण्यासाठी शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांची विशेष बैठक घेऊन काही मौलिक सूचना केल्या आहेत. कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नका, तसेच बदल्यांपासून चार हात दूर राहा. सरकारला आपला कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी तीन पक्षाच्या मंत्र्यांना समन्वय ठेऊन काम करावे लागेल, असा कानमंत्रही दिला.
0 Comments