आघाडीला दुसरा धक्का; काँग्रेसचा ‘हा’ आमदारही राजीनाम्याच्या तयारीत



Congress

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तारही झाला असला तरी अद्यापही खातेवाटप झालं नाही. परंतु, खातेवाटपापूर्वीच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये नाराजीचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्यानंतर जालन्यातील काँग्रेस आमदार कैलास गोरंट्यालही महाविकास आघाडीला दुसरा धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

kailas Gorantyalआमदारकीचा राजीनामा देण्यासंदर्भातील निर्णय आपण कार्यकर्त्यांवर सोपविल्याचे गोरंट्याल यांनी म्हटले आहे.

गोरंट्याल हे जालना विधानसभा मतदारसंघातून तीनदा विजयी झाले. अर्जुन खोतकर यांच्यासारखा प्रतिस्पर्धी असताना जालना जिल्ह्यात काँग्रेसला जिवंत ठेवले. एवढेच नाही तर जालना नगरपरिषदही काँग्रेसच्या ताब्यात ठेवली. परंतु, यावेळीही पक्षाकडून डावलण्यात आले आहे.

मंत्रिपदासाठी डावलून पक्षाने आपल्यावर मर्यादा घातल्याचे सांगत गोरंट्याल यांनी नाराजी व्यक्त केली.

महाविकास आघाडीला पहिला धक्का; अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रिपदाचा राजिनामाअब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

आपल्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द देण्यात आल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं होतं. तसंच कॅबिनेट मंत्रिपद न दिल्यानं ते नाराज होते, असं सांगण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments