
बीड : महाविकास आघाडी सरकारकडून आज मंत्र्यांना खातेवाटप होण्याची शक्यता असताना शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं खातेवाटपापूर्वीच राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या रंगल्या होत्या. यानंतर शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी सत्तारांची समजूत काढली.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी सत्तार यांच्या राजीनामा नाट्यावर आपली प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडीचा एकही आमदार नाराज नाही. सत्तार यांनी राजीनामा दिला नव्हताच. आघाडीचं सरकार आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. त्यामुळे आमदारांनी चिंता करण्याची गरज नाही. आघाडीचा एकही आमदार बाहेर पडणार नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. ते केवळ आघाडीतील आमदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. असा आरोप मुंडेंनी केला.
दरम्यान, अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांच्या बंद दरवाज्याआड चर्चा झाली. या चर्चेनंतर खोतकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांसोबत अब्दुल सत्तार यांची चर्चा झाली आहे. त्यांची नाराजी काही नाही, उद्या दुपारी साडेबारा वाजता अब्दुल सत्तार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितले. तसेच अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला नाही, सत्तारांचे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या
0 Comments