*मा.आ.राजीवदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा**; सभापतीपदी अजय पाटील तर उपसभापतीपदी सुनिल पाटील
चाळीसगाव - पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड आज रोजी पार पडली. पीठासीन अधिकारी तहसीलदार अमोल मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या निवडणूक प्रक्रियेप्रसंगी गटविकास अधिकारी अतुल पाटील उपस्थित होते. नागरिकांचा विशेष मागास प्रवर्ग या पदासाठी सभापतीपदासाठी सकाळी ११ वाजता दोन्ही पक्षातर्फे नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आले. यात सभापती पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे अजय पाटील तर भाजपतर्फे संजय पाटील यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले तर उपसभापती पदासाठी राष्ट्रवादी पक्षातर्फे प्रीती चकोर तर भाजपतर्फे सुनिल पाटील व सुनंदा साळुंखे यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले.
दुपारी १ वाजता नामनिर्देशन पत्र छाननीनंतर सभापती पदासाठी राष्ट्रवादी तर्फे अजय पाटील यांचा तर भाजपच्या वतीने संजय पाटील यांचा अर्ज कायम राहिला तर उपसभापती पदासाठी प्रीती चकोर यांनी माघार घेतली यात सुनंदा साळुंखे आणि सुनिल पाटील यांच्यात मतदान प्रक्रिया पार पडली यात सुनिल पाटील यांची निवड करण्यात आली. सभापतीपदी अजय पाटील यांची तर उपसभापतीपदी सुनिल पाटील यांची निवड घोषित करण्यात आली तर निवड झालेल्या सभापती व उपसभापतींचे माजी आमदार राजीव देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.
मजूर फेडरेशनचे संचालक, हिरापूर ग्रामपंचायतीचे सरपंच ते पंचायत समिती सदस्य असा एकूण अजय पाटील यांचा राजकीय प्रवास राहिला असून हिरापूर गावाला पुनश्च एकदा सभापतीपद मिळाल्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. यापूर्वी सन १९६४ व १९७१ या कालावधीत दिवंगत कॉंग्रेसचे नेते महारु म्हसु पाटील यांनी सभापतीपद भूषविले होते. तदनंतर आज त्यांचे नातू असलेल्या अजय पाटील यांनी आपला झेंडा रोवला आहे.
यावेळी जिभाऊ पाटील, विष्णू चकोर, शिवाजी सोनवणे, सुनिल माळी, भाऊसाहेब केदार, बाजीराव दौंड, पक्षाचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, माजी सभापती विजय जाधव, अभय सोनवणे, जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील, नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष भगवान पाटील, नगरसेवक दिपक पाटील, रामचंद्र जाधव, प्रशांत पाटील, जगदीश चौधरी, मुकुंद पाटील, अमोल चौधरी, अभिजीत शितोळे, भैयासाहेब पाटील, योगेश पाटील, शुभम पवार, कुशल देशमुख, प्रकाश पाटील, चंद्रकांत महाजन, वाल्मिक पाटील, भाउसाहेब पाटील, श्रीकांत राजपूत, दिपक आमले, रोहित पाटील, किरण पाटील, उमेश आंधोळकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते
0 Comments