अजित पवार अर्थमंत्री, तर आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण खातं मिळण्याची शक्यता आहे

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असून, खातेवाटपाचा सुरु असलेला तिढा सुटला असल्याची माहिती पुढे येत आहे. खातेवाटपासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत खातेवाटप निश्चित झाले असून आज संध्याकाळपर्यंत ते जाहीर होण्याची शक्यता आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीनं संभाव्य खातेवाटपाची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, अजित पवार यांना अर्थ व नियोजन खातं दिलं जाऊ शकतं, तर आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण व तंत्रशिक्षण खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते, असं म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments