महाविकास आघाडीत खातेवाटपासाठी स्पर्धा, शरद पवार तिढा सोडवणार


मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरीही खातेवाटपावरून संघर्ष सुरु असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. खातेवाटपाचा तिढा सोडवण्यासाठी तिन्ही पक्षांच्या जोरबैठका सुरु आहेत. खातेवाटपावरून पक्षांतर्गत कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. खातेवाटप आणि पालकमंत्रिपदाचा तोडगा काल (बुधवारी) निघाला नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज पुन्हा एकदा बैठक होणार आहे. यात शरद पवार महत्वाची भूमिका निभावणार असून यातून तेच मार्ग काढणार आहे.

Post a Comment

0 Comments