कुरखेडा व मालेगाव मार्गावर गंभीर अपघात झाला आहे.

कुरखेडा: उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीस मोटरसायकलची धडक एक जण ठार एक गंभीर
कुरखेडा
कुरखेडा मालेवाडा मार्गावरील गोठणगाव नाक्याजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रालीला मोटारसायकलने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक जागीच ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवारी रात्री आठ वाजताचा सुमारास घडली 
        उमेश शेषराव चुरगाये वय 22 असे मृतकाचे नाव तर लोकेश आसाराम राणे वय23असे जखमीचे नाव असून दोघेही बांधगाव येथील रहिवासी आहेत  याबत प्राप्त माहिती नुसार आज बांधगाव येथे मंडई असल्याने घरी आलेल्या पाहुण्यांना पाहुनचारासाठीं म्हणून मृतक व जखमी मोटारसायकल ने कुरखेडा येथून चिकन घेऊन स्वगावाकडे जात असताना  दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रालीला धडक दिल्याने अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच येथील भाजपाचे तालुकाध्यक्ष राम लांजेवार यांनी घटनास्थळी जाऊन कुरखेडा पोलिसांच्या सहकार्याने तातडीने जखमीला उपचारासाठी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Post a Comment

0 Comments