*नागरीकत्व कायद्याविरोधात भोकर येथे भव्य मोर्चा*

*नागरीकत्व  कायद्याविरोधात भोकर येथे भव्य मोर्चा*

*भोकर :दि२० ( प्रतिनिधी )* लोकसभेसह राज्यसभेतही बहुमताने पारीत झालेल्या भाजप सरकारच्या नागरिकत्व  संशोधन कायद्याविरोधात  येथील तहसील कार्यालयावर   मुस्लिम  बांधवांनी  आज (दिनांक 20 )मोर्चा काढून  भारत सरकार विरोधात आपला संताप व्यक्त केला.

 काजी मस्जिद मरकजपासून शांततेच्या मार्गाने पोलिस ठाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरचौक मार्गाने नारे देत, हातात काळे ध्वज, तिरंगा, व अशोकचक्र असलेला निळा ध्वज घेऊन ''संविधान जिंदाबाद, हिंदू मुस्लिम शिख ईसाई, हम सब है भाई,भाई , मोदी, अमित शहा मुर्दाबाद '' अश्या घोषणा देत हा मोर्चा भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला.
येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करून  परिसर दणाणून सोडण्यात आला  .या सभेत मुस्लिम समाजातील अनेक धर्मगुरूंनी आणि मान्यवरांनी  भारतीय नागरिकत्व कायद्यास कडाडून विरोध केला. दरम्यान भाषणाच्या  कार्यक्रमानंतर राष्ट्रपती कोविंद यांना तहसिलदारामार्फत निवेदन देण्यात आले . नागरिकता संशोधन विधेयक हे नागरिकांच्या सार्वभौम अधिकार कर्तव्यांची पायमल्ली करणारी बाब असुन या बाबत महामहिम राष्ट्रपतींनी पुनर्विचार करावा असे सदर निवेदनात नमुद केले आहे.  मौलाना हाफिज,मौलाना उमर फारूक,मुफ्ती फुरखान,मौलाना रिजवान सरवरी, खालिद मौलाना, मौलाना रियाज, मौलाना हाफिस सद्दाम, मुफ्ती खुर्शीद  साहेब,मौलाना शुजाओद्दीन, ऍड मो. सलीम ऍड मुजाहेद्द एजाज अहेमद ,माजीद लाला,अब्दुल कादरी, खाजू इनामदार आधी प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो मुस्लीम बांधव मोर्चात सहभागी झाले होते

Post a Comment

0 Comments