भोकर शहरात टाळेबंदीस नागरीकांचा प्रतिसाद अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद.

*

भोकर : जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोरोना विषाणूची शृंखला तोडण्यासाठी  नांदेड जिल्हाधीकारी डॉ .इटनकर यांनी जिल्हयात २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून ४ एप्रिल पर्यंत टाळेबंदीचा आदेश जारी केला आहे . त्यास भोकरकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे .
   
  नांदेड जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य, महसूल , पोलीस तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आदी विभागांतील कर्मचारी परिश्रम घेत आहेत . 
दरम्यान भोकर शहरातील अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून प्रशासनास सहकार्य केल्याचे दिसून आले . 
   मागील अचानक जाहीर केलेल्या टाळेबंदीमुळे सामान्य नागरिकांची त्रेधा त्रिपीट झाली होती .मात्र यावेळी जिल्हा प्रशासनाने पुरती खबरदारी घेत नागरीकांना पूर्व सुचना दिली असल्याने त्यांनी अपरिहार्यपणे टाळबंदीला प्रतिसाद दिला आहे .

Post a Comment

0 Comments