*
नळदुर्ग : -(प्रतिनिधि) संपुर्ण देशभरात विशेषतः महाराष्ट्र मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विळखा दिवसेंदिवस आवळत चालला असताना तुळजापूर तालुक्यातील परस्थिती नियंत्रणात रहावी यासाठी माजी मंत्री तथा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून नळदुर्ग शहरातील वार्ड क्रमांक 1 ते 17 मध्ये सोडीयम हायड्रोक्लोरिक या जंतू नाशकाची फवारणी अत्याधुनिक मशिनद्वारे करण्यात आली.
या फवारणीची सुरुवात वसंतनगर येथून करण्यात आली. यावेळी नळदुर्ग चे माजी उपनगराध्यक्ष तथा विध्यमान नगरसेवक नय्यर जहागिरदार, निरंजन राठोड, दयानंद बनसोडे, छमाताई राठोड, पत्रकार सुनील बनसोडे जिलानी कुरेशी, स्वच्छता निरीक्षक मुनीर शेख आदी उपस्थित होते.
0 Comments