तेलंगणातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले.

 *भोकर (प्रतिनिधी) तालुक्‍यातील तेलंगाणा सीमेलगत असलेल्या रहाटी चेक पोस्टवर तेलंगणातील अत्यावश्यक सेवेतील कोरोना पॉझिटिव्ह वाहनचालकाच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून  ०३ पोलिस अधिकारी, ०९ पोलिस कर्मचारी, ०२ होमगार्ड, तसेच ०१ आरटीओ अधिकारी,०२ आरटीओ कर्मचारी व ०१ स्वंयपाकी अशा एकूण 18 जणांना श्री गुरु गोविंदसिंघजी  जिल्हा रुग्णालय  नांदेड येथे अधिकच्या तपासणीसाठी पाठवून क्वारंटाईन करण्यात आलं आहे.*
*तेलंगणा राज्यातल्या अत्यावश्यक सेवेतील  ट्रकचा वाहनचालक  दिनांक 16 एप्रिल रोजी राहाटी चेक पोस्ट मार्गे खामगाव जिल्हा बुलढाणा येथे आंबे भरलेला ट्रक  घेऊन गेला होता  परत येताना  कांदे लोड करून रहाटी मार्गे दिनांक १८ एप्रिल रोजी तेलंगाणा राज्यात जात असताना  भोकर पोलिसांना   मिळालेला  माहितीवरून त्या वाहनाच्या  ड्रायव्हर व क्लिनर यांना ताब्यात घेतले. तेलंगणा राज्याच्या प्रशासनाने सदरील वाहन चालक हा कोरोना   पॉझिटिव असल्याची माहिती महाराष्ट्र प्रशासनाला दिली होती यावरून " त्या " वाहनचालकास ताब्यात घेण्याची कार्यवाही भोकर पोलीसांकडून करण्यात आली.दरम्यान " त्या " वाहनचालकाच्या संपर्कात आल्याच्या कारणावरून आधीकच्या सुरक्षिततेची बाब म्हणून रहाटी चेक पोस्टवरील कर्तव्यावर असलेल्या ०३ पोलीस अधिकारी ०९ पोलीस कर्मचारी ०२होमगार्ड ०१ आरटीओ ०२ आर.टी.ओ कर्मचारी व ०१ स्वयंपाकी असे एकूण 18 जणांना नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात अधिकच्या तपासणीसाठी क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी दिली आहे. दरम्यान तात्काळ राहाटी चेक पोस्ट सॅनेटाईज करून लागलीच बंदोबस्तासाठी दुसरी  तुकडी तैनात करण्यात आली आहे. भोकर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसूल, पोलीस, आरोग्य प्रशासनाच्या प्रभावी नियोजन सुरू असताना मात्र या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments