टाळ्या किंवा थाळ्या वाजवून कोरोना जाणार नाही; महाराष्ट्रात कर्फ्यू- उद्धव ठाकरे

मुंबई: केवळ थाळ्या किंवा टाळ्या वाजवून कोरोना जाणार नाही. रविवारी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सगळ्यांनी टाळ्या आणि थाळ्या वाजवल्या. ही गोष्ट आपण अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांच्या कृतज्ञतेप्रती केली होती मात्र आज बऱ्याचश्या लोकांनी घराबाहेर पडून नियम मोडला. त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात नाईलाजास्तव संचारबंदी लागू करत आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

येणारे 10 ते 15 दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. या काळात आपण शासनाने दिलेल्या आदेशानुसार घरात बसावं. कुठेही नियमाचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

अनावश्यक सेवा वगळता आता महाराष्ट्रात बस, रेल्वे, लोकल खासजी गाड्या बंद असणार आहेत. तसंच जिल्ह्यांच्यासीमा देखील बंद केल्या जाणार आहेत. त्यामुळे एका जिल्ह्यांतून दुसऱ्या जिल्ह्यांत प्रवास करता येणार नाही.
दरम्यान, कालच्या कर्फ्यूनंतर लोकांनी आज पुन्हा एकदा गर्दी करायला सुरूवात केली होती. त्यानंतर आज राज्य शासनाला संचारबंदीचं पाऊल उचलणं गरजेचं ठरलं. आता 31 मार्चपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे.

Post a Comment

1 Comments