कोरोना मुळे तुळजाभवानी देवीचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला

तुळजापूर: करोना विषाणू संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीचे दर्शन उद्या मंगळवार दिनांक 17 मार्चपासून पुढील आदेश  येईपर्यंत बंद करण्यात आले असल्याची माहिती  तहसीलदार योगिता कोल्हे यांनी दिली. धार्मिक कार्यक्रम तसेच  इतर पूजा विधि नियमित पार पडणार असून फक्त दर्शन बंद करण्यात आले आहे, असंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर  चैत्र पौर्णिमेची यात्राही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments