पिंपळनेर :दि. 25__ महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी सोलापूर जिल्हा ग्रंथालयाच्या अध्यक्षपदी सुरेश यादव यांची निवड करून तसे नियुक्तीचे पत्र माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.
सुरेश यादव हे गेल्या पंचवीस वर्षापासून ग्रंथालयाच्या चळवळीत ग्रंथालयाशी निगडित काम करीत आहेत. अद्यापर्यंत त्यांचे जिल्ह्यामध्ये ग्रंथालय चळवळीत मोठे योगदान आहे. सर्वसामान्य ग्रंथालयाचा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी सर्वसामान्य प्रामाणिक पणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जिल्हा अध्यक्ष पदाची संधी दिली. यावेळी बोलताना सुरेश यादव म्हणाले की जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तालुका अध्यक्षांच्या निवडी आणि जिल्हा कार्यकारणी येत्या दहा दिवसात तयार करून जिल्ह्यातील ग्रंथालयांच्या विविध अडचणी सोडविण्यास संदर्भात पुढील काळात प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील , समन्वयक सौ रीता बाविस्कर , प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत लोंढे , ग्रंथ निवड समितीचे राज्याचे सदस्य हरिदास रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली काम करून न्याय देण्याचा प्रयत्न करणार.
या निवडीबद्दल भारतीय आजाद कामगार महासंघाचे राज्याचे अध्यक्ष प्राध्यापक सी.बी .गंभीर , अॅड.अनिल पाटील , विनोद गायकवाड , जीवन लोकरे , अरविंद यादव , दत्ता घोडके , संपत अंधारे आदींनी अभिनंदन केले आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाचे उपाध्यक्ष प्रशांत लोंढे , ग्रंथमित्र कांतीलाल साळुंखे , सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष नागेश बापू खटके आदी उपस्थित होते.
0 Comments