
Mumbai :राज्यातील पाच जिल्हा परिषदांसाठी आज भाजपा आणि महाविकास आघाडी आमने-सामने उभ्या ठाकल्या आहेत. दरम्यान, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या पाच जिल्हा परिषदांसाठी आज मंगळवारी मतदानाला सुरूवात झाली असून, नागपूर, वाशिम, अकोला, धुळे आणि नंदुरबार या जिल्हा परिषदांमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये मुख्य लढत आहे.
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येत महाविकास आघाडी बनवून राज्यात सरकार स्थापन केले आहे, हे येथे उल्लेखनीय.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्यातील असून, नागपूर जिल्ह्यात ग्रामीण जनता उत्साहाने मतदान करायला येत आहे. नागपूर जिल्ह्यात एका बाजूला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, तर दुसऱ्या बाजूला गृहमंत्री अनिल देशमुख तसेच पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी प्रचाराचा धुरळा उडवला.
धुळे जिल्हा परिषदमध्ये यावेळी काँग्रेस पक्ष महाआघाडीतून निवडणूक लढवित आहे. जिल्ह्यात एकूण ५६ मंडळे (सर्कल) असून, पाचजणबिनविरोध निवडून आले आहेत. आता ५१ जागांसाठी मतदान होत
0 Comments