उमरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला

प्रतिनिधी: इब्राहीम शेख
25/10/2025 नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी श्री. शिरीष देशमुख गोरठेकर आणि श्री. कैलास देशमुख गोरठेकर यांच्या नेतृत्वाखाली तब्बल १५०० कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षाच्या तत्त्वांवर विश्वास ठेवून एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा स्वीकारली, ही बाब माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आणि प्रेरणादायी आहे. मी तमाम नव्यानं पक्षात आलेल्या मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक पाणी, सुविधा आणि संसाधनं उपलब्ध करून देणं ही आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे. अप्पर पैनगंगा कालव्याचं उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, अशी खात्री दिली. त्याचबरोबर तरुण शेतकऱ्यांना आधुनिक आणि प्रगतशील शेतीचं प्रशिक्षण दिलं जाईल, जेणेकरून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग मोकळा होईल.
आज पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला गेला आहे. नवीन कार्यकर्त्यांनाही तितक्याच सन्मानानं स्थान दिलं जाईल, वागवलं जाईल. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे, अशा भावना व्यक्त केल्या. उमरीसह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट होत आहे, ही समाधानाची बाब आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यानं जनतेच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभं राहू, सर्वांच्या समस्या व अडचणी दूर करू, अशी हमी दिली.

Post a Comment

0 Comments