Breking news 🗞️

हिमायतनगर तालूका राष्ट्रवादी‌ काॅग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) अध्यक्ष पदी वामनराव पाटील तर शहराध्यक्षपदी अमोल धुमाळे.



हिमायतनगर :- प्रतिनिधी ( संदीप कोमावार)

हिमायतनगर तालूका राष्ट्रवादी‌ काॅग्रेस पार्टी अजितदादा पवार गट तालूकाध्यक्ष पदी वामनराव पाटील वडगावकर यांची निवड करण्यात आली आहे.तर शहराध्यक्षपदी अमोल पाटील धुमाळे यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र दोघांनाही नूकतेच प्राप्त झाले आहे. 

वामनराव पाटील वडगावकर यांनी अल्पावधीतच पक्ष संघटनेत वेगाने काम करूण वरिष्ठांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांना राष्ट्रवादीच्या तालूकाध्यक्ष पदाची संधी देण्यात आली असून, ऐन नगरपंचायत व जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हि निवड महत्वपूर्ण मानली जात आहे. 
माजी तालुकाध्यक्ष अभिषेक लूटे यांना वरिष्ठ पदांवर बढती देण्यात आली असून जिल्हा कमेटीवर त्यांना महत्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. वामनराव पाटील व अमोल धुमाळे यांच्या या निवडीबद्दल त्यांच्या मित्र परिवारांतून अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments