Breking news 🗞️

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

हिमायतनगर प्रतिनिधी : संदीप कोमावार
 दिनांक 01 ऑक्टोबर 2025 रोजी ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड मा.डॉ.संजय पेरके सर व निवासी वैद्यकीय अधिकारी मा डॉ.राजाभाऊ बूट्टे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रा.रु .हिमायतनगर वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास जाधव सर, यांच्या निरीक्षणाखाली स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाट्क व पाहुणे म्हणून खासदार श्री नागेशजी पाटील आष्टीकर साहेब व आमदार श्री बाबुरावजी कदम पाटील कोहळीकर साहेब तसेच सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शहरातील मान्यवर यांची उपस्थिती होती.यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास जाधव सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले 
 तसेच उपस्थित सर्व गरोदर माता, स्तनदा माता यांची आरोग्य तपासणी करण्यात आली व स्तनपाना विषयी मार्गदर्शन करण्यात आले .शिबिरात आलेल्या सर्व बालकांचे लसीकरण करण्यात आले. शिबिरात लाभलेल्या नेत्रतज्ञ त्वचारोग , मानसिक रोगतज्ञ ,  
नाक कान घसा ,तज्ञ यांच्याद्वारे उपस्थित रुग्णांची तपासणी करण्यात आली . शाळेतील विद्यार्थ्यांना आहार व आरोग्य तसेच योग या बाबतीत समुपदेशन करण्यात आले व हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली तसेच क्षयरोग रुग्णांना फूड बास्केटचे वितरण करण्यात आले . या शिबिरात रक्तदान शिबीर घेण्यात आले . याशिवाय NCD विभागात उच्च रक्तदाब, मधुमेह हृदय विकार कॅन्सर बाबतीत समुपदेशन व उपचार करण्यात आले . डेंटल विभागात रुग्णांची तपासणी व मुख रोग तसेच oral कॅन्सर,Breast screening चे समुपदेशन करण्यात आले तसेच मान्यवर यांनी शिबिरात विभागनिहाय भेट दिली तसेच किशोरवयीन लाभार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी करून समुपदेशन करण्यात आले. एकूण 540 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी डॉ. विकास वानखेडे सर, डॉ. वाळके सर, डॉ. बुरकुले सर, डॉ. वागतकर सर, डॉ बुक्तरे सर, डॉ. देशमुख सर, डॉ. किसवे सर, डॉ. मामीडवार मॅडम,डॉ. मुनेश्वर मॅडम,डॉ. सदावर्ते सर, डॉ. मेहेत्रे सर व सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments