मुस्लिम समाजाच्या युवकावर आय लव मोहम्मद संदर्भात खोटे गुन्हे दाखल केले (तामसा येथे निषेध )


तामसा ( प्रतिनिधी) तामसा येथे मुस्लिम समाजाच्या वतीने आय लव मोहम्मद बॅनरबाजी करणाऱ्या मुस्लिम युवकावर कानपूर येथे खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर अन्याय या अन्याय विरोधात कानपूर पोलीस प्रशासनाची निंदा करत तामसा येथील मुस्लिम समाज रस्त्यावर उतरून या सर्व संदर्भामध्ये माननीय राष्ट्रपती व मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित असलेले सर्व मुस्लिम समाजातील युवा उपस्थित होते सदर तामसा येथील मुस्लिम समाजाच्या वतीने मुस्लिम समाजाच्या युवकावर झालेल्या खोटे गुन्हा तात्काळ मागे घ्या व तसेच कानपूर पोलीस प्रशासनावर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली येणाऱ्या काळामध्ये जर अशाच प्रकारचे मुस्लिम समाजाच्या वर अन्याय अत्याचार झाल्यास प्रशासना कानाडोळा का करत आहे या सर्व प्रकरणाकडे वरिष्ठ व देशाचे पंतप्रधान लक्ष घालण्याचे गरज आहे अशी प्रतिक्रिया सामान्य मुस्लिम समाजातून होत आहे सदर यावेळी उपस्थित असलेले लोकांकडून आय लव्ह मोहम्मद अशी घोषणा करण्यात आली आहे

Post a Comment

0 Comments