येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा धोका टळला .

कर्नाटका. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा धोका टळला असल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्नाटकात नुकतेच 15 जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या. याची आज मतमोजणी सुरू आहे. दरम्यान भाजपला सरकार टीकवण्यासाठी सहा जागा जिंकणे आवश्यक होते. भाजप सहा जागांवर विजयी झाली
आहे. यामुळे भाजप सरकारचा मोठा धोका टळला
कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले होते. यानंतर येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार सत्तेत आले. मात्र आमदारांच्या बंडखोरीनंतर होत असलेल्या विधानसभेच्या 15 जागांवरील पोटनिवडणुकीचे निकाल आज समोर आले. सध्या समोर आलेल्या निकालांमध्ये सहा जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. यामुळे येडियुरप्पा सरकारचा धोका टळला आहे.

Post a Comment

0 Comments