Breking news 🗞️

२६/११ मुंबई हल्ल्याच्या १८व्या स्मृतिदिनानिमित्त शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली!

मुंबई : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज १८ वर्षे पूर्ण होत आहेत. या काळ्या दिवसाची आठवण आजही देशवासीयांच्या मनात कायम आहे. या हल्ल्यात १६६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला, तर ३०० हून अधिक नागरिक जखमी झाले होते.२६ नोव्हेंबरच्या रात्री सुरू झालेला हा दहशतवादी हल्ला २९ नोव्हेंबर २००८ पर्यंत सुरू होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताज हॉटेल, ट्रायडेंट हॉटेल, नरिमन हाऊस आणि लिओपोल्ड कॅफे यांसह मुंबईतील अनेक ठिकाणांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते.या संकटाच्या काळात मुंबई पोलीस, सुरक्षा दल, नौदलाचे मरीन कमांडो आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) जवानांनी शौर्याने लढा देत अनेक नागरिकांचे प्राण वाचवले. कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या शूर जवानांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही.यंदाच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे NSG मुंबईच्या वतीने '#NEVEREVER' या संकल्पनेअंतर्गत स्मृतिसोहळा आणि प्रतिज्ञा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून शहीदांना श्रद्धांजली, हल्ल्यातील बचावलेल्यांचा सन्मान आणि दहशतवादाविरोधात जागरूकतेचा संदेश दिला जात आहे.२६/११ हा केवळ इतिहासातील एक दिवस नसून राष्ट्रीय एकता, धैर्य, सतर्कता आणि मानवतेचे महत्त्व अधोरेखित करणारा दिवस आहे.शहीद जवानांना आणि हल्ल्यातील निष्पाप मृतांना विनम्र अभिवादन! त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी आहे.

— LOKTAK NEWS संपादक : शेख उमर (BAMCJ) | संपर्क : 8983233436

Post a Comment

0 Comments